Tuesday, October 4, 2016

Er Rational musings #739

Er Rational musings #739



निळू फूले, मधुकर तोरडमल, अनंत जोग, रवी पटवर्धन, रमेश भाटकर, राजशेखर वगैरे ना पडद्यावर वा स्टेज वर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा राग येतो. भूमिका कुठचीही का असेना.



ओम शिवपूरी, सत्येन कप्पू, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, मनमोहन, कादर खान, जाँनी लीव्हर वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा ओंगळपणा वाटतो. भूमिका कुठचीही का असेना.



पिंचू कपूर, प्रेमनाथ, सप्रू, रेहमान, अमरीश पूरी, प्राण, अमजद खान, रझा मुराद, जीवन वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारची जरब, भीती वाटते. भूमिका कुठचीही का असेना.



ओमप्रकाश, अशोककुमार, उत्पल दत्त, डेव्हीड, असीत सेन वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा विश्वास वाटतो. भूमिका कुठचीही का असेना.



मला कायमच ए के हनगल, राजेंद्रकृष्ण वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल की एक प्रकारची किव येते. भूमिका कुठचीही का असेना.



सईद जा़फरीं, रेहमान वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा खानदानी पणा जाणवतो. भूमिका कुठचीही का असेना.



देवेन वर्मा, मेहमूद, राजेंद्रनाथ, असरानी, वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्यावर एक प्रकारचा निर्भेळ आनंद मिळतो. भूमिका कुठचीही का असेना.



के एन सिंग, आय एस जोहर वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा गूढत्वाचा भास होतो. भूमिका कुठचीही का असेना.



केश्तो मुखर्जी, जाँनी वाँकर, मुक्री, पेंटल, विजू खोटे, जगदीप वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा कणव येते. भूमिका कुठचीही का असेना.



हे सगळे महान कलाकार. यांच्याबरोबर आपोआपच एक प्रकारचा कनेक्ट प्रेक्षकांना जाणवतो यातच या सर्वांचे सहजसुंदर उत्स्फूर्त अभिनय श्रेष्ठत्व सिध्द होते. यातच यांचे यश आहे!



दादा लोक्स. वानगीदाखल या काही च नावांचा उल्लेख केलाय, रेफरन्स म्हणून.



सध्याच्या यंन्गीस्तानला या वरच्यांशी कनेक्ट होणं कठीणाये, म्हणतीलच ते, की हे कोण? कुठल्या जमान्यातले? त्यांच काय चुकलं म्हणा, कारण त्यांचा 'पाला' पडलाय तो सलमान खान, (व आमीर खान, व शाहरूख खान), व फावडा खान, व माहीरा खान, व मयांक शेखर, व यांच्यासारख्या 'महान' कलाकारांशी; यंन्गीस्तान चा काय गुन्हा?याच्या शिवाय जोडीला, या "महान" कलाकारांच्या पाठी, सईद मिर्झा, ओम पूरी, शाम बेनेगल, मीता वशिष्ठ व महेश भट (याशिवाय लीस्ट अपूरीच राहते!), व इत्यादि बुजूर्ग 'संवेदनशील' आर्टिस्ट फ्रँटर्निटी खंबीरपणे चेतवतपेटवत उभी अाहे च की. लाज आणतात!



यांना सांगतोय, की अभिनय कशाशी जेवतात, ते संजीव कुमार, बलराज सहानी यांसारख्या कलाकारांकडनं शिका. आणि दिग्दर्शन, संगीत अशा इत्यादि सर्व अंगांकरिता तुमची शाळा घेण्यासाठी (पडद्याआड गेलेली) अख्खी फौज उभी आहे. अकलेचे तारे आणि अब्रूचे धिंडवडे, आणि माजमस्तवालपणा!



तरूणाई ला सांगतोय, की री-मिक्स गाणी एन्दाँय करता ना? री-वाईंन्ड व्हा, सगळे जूने सिनेमे, नव्या नजरेने पहा, तुम्हाला या शतमूर्ख एहसानफरामोशांचे तोंड पहाण्याची पण इच्छा होणार नाही; गँरेंन्टी देतो.



बाँयकाँट. यांना पैशाचीच भाषा समजते...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

 ५ आँक्टोबर २०१६



[(www.milindkale.com)]

[(milindmkale.blogspot.in)]

No comments:

Post a Comment