Wednesday, October 26, 2016

Er Rational musings #782

Er Rational musings #782



आमची जाँईंट फँमिली; बरं, आठ बाजूंनी आम्ही गुजराती लोकांनी वेढलेले, तरी, टिक्कून उभे, मोठे प्रशस्त घर. मग काय? पाव्हणे रावळे, मित्रमैत्रिणी गोतावळा, पाजारीशेजारी, गर्दी गडबड गोंगाट. पूर्वी आज्जी - आई - आमच्या अहो, म्हणजे मायाबाई (व बाबांना!) या सगळ्यांना निरनिराळे पदार्थ बनवायची, स्वयंपाकाची प्रचंड आवड, आणि खाण्याची आवड असलेले आम्ही सारे, यामुळे दिवाळी फराळ म्हणजे एक अँन्यूअल इव्हेंट! अजूनही.



पोह्याचा चिवडा, रवा बेसन लाडू, चकली, शेव, गोड शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या, पाकातले चिरोटे, करंज्या, अनारसे, कडबोळी, वड्या इ. मुबलक बनवायचे हे सगळेजण. सकाळी, संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून, मध्यभागी डबे ताटल्या (डिशेस नव्हे) मांडून खादाडी! ओमss स्वाहाss



परंतु माझ्या दृष्टीने दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा, चिवडा व चिवडा, इतर सर्व तोंडी लावायला! कारण दिवाळी फराळ म्हणजे चिवडा, अशी माझी ठाम समजूत होती व आहे!



नुसता हादाडायचा हापसायचा!



सध्षा आमच्या अहो, म्हणजे मायाबाईंची लगबग चालू आहे. त्यांचा कामाचा उरक प्रचंड आहे; व वेळीच कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत.



तरी, या मंगलप्रसंगी आपणा सर्वांची उपस्थिति प्रार्थनिय आहे. हेच आग्रहाचे निमंत्रण समजून, समस्त सन्मित्रांनी व सन्मैत्रिणींनी (!), सहकुटुंब सहपरिवार व आप्तेष्टासहित आमच्याकडे फराळप्रसादाला यावे, ही नम्र विनंती.



शुभ दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. तसेच, येतं नूतन वर्ष आपणा सर्वांसाठी सुख समृद्धिचे व ऐश्वर्याचे उज्ज्वल भरभराटीचे ठरावे, व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



कळावे, लोभ आहेच, तो वृध्दींगत व्हावा.



आपला कृपाभिलाशी...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२७ आँक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment