Er Rational musings #736
दूसऱ्या नोकरीत खूप चांगल शिकायला मिळालं. नवीन सिस्टीम्स, साँफ्टवेअर व प्रोसेसेस. आणि कोअर टेक्नीकल काम करता करता, कस्टमर रिलेशन, व लीएझनींग इत्यादि अनेक. तीन विशेष गोष्टी सांगायच्या, तर
~ 'वेळ' पाळणं
~ ड्राफ्टींग
~ बजेटींग
गमतीचा भाग म्हणजे, या तिन्ही चीजा, वैयक्तिक सांघिक कौटुंबिक सार्वत्रीक सार्वजनिक जीवनात अत्यंत महत्वाच्या ठरतात.
१) मिटींग वा अपाँईंटमेंट असली, तर किमान पंधरा मिनिटे आधी स्थानी हजर रहायचं, हे अंगवळणी पडलय. आजही, कुणालाही एक वेळ दिली की, मी चांगली वीसतीस मिनिटं आधी पोहोचतो. पर्फेक्ट टायमाआधी पाच दहा मिनिटे मी हजरजागी. आणि, याविरूध्द समोरच्यान वेळ नाही पाळली, तर त्या व्यक्तीबद्दल प्रचंड निगेटीव्ह कल. आँफकोर्स संयुक्तिक कारण नसेल तर.
टायमिंग अचूक असलं पाहीजे.
२) एखादा आँफिशीयल पत्र-व्यवहार, वा इंन्ट्रा-डिपार्टमेंन्टल कम्यूनिकेशन, वा ई-मेल्स.
दूनिया आदान-प्रदान पे चलती हैं भिडू! आपल्याला काय सांगायचय, ते समोरच्याच्या डोकी पोहोचले पाहीजे ना!
३) कँपिटल बजेट, व रेव्हेन्यू बजेट. हा ये लफडेवाली चीज हैं। बेसीकली वन टाईम काँस्ट व रिकरींग काँस्ट यांचा लेखाजोखा.
पहिल्या दोन गोष्टींमुळे आपण थ्थोडे आयडीयलिस्टीकपणा कडे झुकतो, परंतु/आणि, तिसऱ्या गोष्टीमुळे रियलिस्टिक पणा नसानसांत भिनतो. या बजेटींग मध्ये मिनी, स्माँल स्केल वा लार्ज स्केल इंडस्ट्री, किंवा प्रोप्रायटरी, प्रायव्हेट लिमिटेड/लिमिटेड लायबिलिटी कंपनी, वा पब्लिक लिमिटेड याचा किंवा, अल्प, मध्यम वा उच्च-अती उच्च उत्पन्न गट, वेग्रे असा काही भेदभाव नाही करता येत.
बजेटींग म्हणजे कुठल्या खिशातनं, कुठल्या कोनाड्यातनं, कुठल्या उशीखालून, वा कुठल्या स्त्रोतातनं, किती/केव्हा/कुठे/कधी/का/कशासाठी व कसे पैसे खर्चायचे.
उदाहरणार्थ, स्थावर जंगम मालमत्ता, जमीनजुमला हे जसे कँपिटल आयटम्स आहेत, तसेच टिव्ही, चारचाकी, एअर कंडिशनर वा पंखा वगैरे तत्सम गोष्टी सुध्दा कँपिटल आयटम या वर्गात मोडतात. पेट्रोल/डिझेल/सीएनजी इंधन, व वीज, यासम गोष्टी म्हणजे आपलं रेव्हेन्यू बजेट, घर(!)खर्च. हा, यहाँ पे थोडा लोचा हो रहेला हैं।
कसा?
बघा, कुठलीही घर वस्तू डोळ्यांसमोर आणा. दोन च उदाहरणं घेऊयात.
टिव्ही? ह्हे मोठ्ठाले स्क्रीनचे, कायपण ४००० एचडी वगैरे, घरांतली अर्धी भिंत व्यापून टाकणारे फ्लँटस्क्रीन, सिनेमागृहाप्रमाणे. कँपिटल काँस्ट ठिकाय ओ, पण रेव्हेन्यू काँस्ट? अहो, मेंन्टेनन्स नाही, पण वीज-उर्जा? त्याच्या किमती आटोक्यात नको का? अपारंपारीक उर्जा जनरेट करायला नको का? पण जरा बैकवर्ड इंटिग्रेशन केले, तर असे लक्षात येईल की या उर्जेचीच कँपिटल काँस्ट प्रचंड आहे. म्हणजे जागाव्याप्ती व साहित्य पकडून. या उर्जेची रिकरींग काँस्ट अत्यल्प, तरी देखील रिटर्न आँन इन्व्हेस्टमेंन्ट (आरओआय), काही मेळ बसत नाही अजूनही.
याइथेच तर खरी मेख आहे, कसोटी आहे तंत्रज्ञानाची. समुद्राच्या लाटा, सोलर, विंन्ड मिल्स, कचऱ्यापासून वगैरे वीजनिर्मिती तंत्रात जोरदार लक्ष द्यायला पाहीजेलाय. फार कशाला, आपल्या चालण्यातनं प्रेशरमुळे, पापण्यांच्या मूव्हमेंन्टनं(!) होणाऱ्या सूक्ष्म लहरींमुळे, व चारचाकीच्या टपावरून सोलर पँनेल बसवून, वगैरे, असल्या अचाट कल्पनांतून स्वस्त अविरत मुबलक वीज निर्मिती कशी करता येईल, याचा शोध घ्यायला पाहीजे. वीजेचा दर प्रति युनिट २ रूपयांपेक्षा जास्त नको जायला!
चारचाकी? ह्ह्या मोठ्ठाल्या कम्फर्टेबल गाड्या. एसी टकाटक, पाँवर स्टिअरींग पाँवर विंन्डोज, पाँवर पँक्ड पाँवर ड्रिव्हन. तसं सोप्पय, इंजिनाची क्षमता वाढवली की टाँर्कस्पीड सग्गळ आलच की. बर, जर्रा लेदर सीटा, एसी, इन बिल्ट म्युझिक विथ सहाआठ स्पीकर्स, चार्जिंग स्लाँट, काँर्ड फँसिलिटी, कीलेस(!) इग्निशन, रंगरंगोटा, इंटिरियर, लेग स्पेस इत्यादि इत्यादि. हे सोप्पय ओ. काय कठीण आहे? खर्च वाढवला की येत करता. इंधनाच्या चढउतारी डाँलर व बँरल(!)वर अवलंबून असलेल्या किमती बाजूला ठेवू पण गाड्यांचे अँव्हरेज? रिटर्न आँन इन्व्हेस्टमेंन्ट (आरओआय), काही मेळ बसत नाही अजूनही.
याइथेच तर खरी मेख आहे, कसोटी आहे तंत्रज्ञानाची.
इंजिन एफिशियन्सी वर, अँव्हरेज वर लक्ष द्या की जरा. म्हणे असल्या हाय एन्ड गाड्यांचे अँव्हरेज बघायचे नसते (लोकं वेड्यात काढतील}. तो भाग सोडा. परंतु हे एक प्रकारचे आव्हानच आहे असं ह्या कंपन्या, आँटोमोबील इंजिनियर्स का समजत नाहीत? २५ लाखाच्या चारचाकीचे अँव्हरेज ५० तरी असायला पाहीजे ब्वाँ. हम्मम्मम्म!
माझ्या दूसऱ्या नोकरीच्या ठिकाणी आम्ही भर द्यायचो तो काँस्ट कटिंग ला. काँस्ट रिडक्शन बाय इनोव्हेटिव्ह वे. नाँट अँट द एक्स्पेन्स आँफ, आँर काँम्प्रोमायझिंग आँन, नेसेसिटी, नीड, क्वालिटी व इव्हन अँस्थेटिक्स!!
वरील उदाहरणं प्रतिकात्मक स्वरूपाची आहेत. बँलन्स साधला गेला पाहीजे. थिंन्क आऊट आँफ द बाँक्स.
नाहीतर मग आहेच भरमसाठ इंम्प्रेस्ट कँश, पेटी खर्चासाठी...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
३ आँक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment