Er Rational musings #737
"This call may be recorded for training n quality purpose". "गुणवत्ता एवं प्रशिक्षण के लिये यह काँल रिकार्ड किया जा सकता हैं।"
"Please wait, your call is important to us. Our customer care executive will talk to you, shortly."
"हिंदी में जानकारी के लिये १ डायल करे". "To continue in English, press 2". "मराठी करिता ३ दाबा."
"Please wait; you are in a queue." "कृपया प्रतीक्षा कीजीये, आंप कतार में हैं।"
१८०० ने सुरू होणाऱ्या टेलिफोन नंबर वर काँल केला, की वरील तुणतुणी ऐकायला मिळतात. आयव्हीआरएस सिस्टीम. काँल सेंन्टर्स. आणि हे १८०० ने सुरू होणारे म्हणजे टोल (टोल का म्हणतात हे गुलदस्त्यातल अनाकलनीय गुपीत आहे) फ्री नंबर्स.
ही काँल सेंन्टर्स कुठेतरी असतात अख्या भारतात. बहुतकरून गुरगाव वा चेन्नई ला. यंन्ग पोरीपोरं, निराळ्या शिफ्टस् मध्ये काम करतात, व बहुतेक वेळा त्यांचं काम चोख करतात, त्यांच्या चौकटीत राहून. एक बरय, की तक्रारदाता ही तसा खूष होतो, कारण कंम्प्लेंन्ट केल्याचं समाधान, कुणीतरी शांतपणे ऐकून घेतय, तक्रार क्रमांक मिळतोय, व बरेचदा निराकारण ही होतय, असले सुखद अनुभव येतात.
यातलं हे जे आहे ना, ""This call may be recorded for training n quality purpose". "गुणवत्ता एवं प्रशिक्षण के लिये यह काँल रिकार्ड किया जा सकता हैं।""
ते त्यामानाने नवीन आहे; त्यालोकांनी वाईटबऱ्या अनुभवांमुळे अँड केलय अस दिसतय.
काही कोणी उपटसुंभ, वा जेन्यूईन त्रासलेला ग्राहक, ग्रीव्हान्सेस वा कंन्झ्यूमर फोरम कडे गेला, तर असावं बँकअपला, म्हणून असावं, अस वाटतय मला.
हल्ली, मी सुध्दा साँल्लिड शक्कल लढवलीये. अशा नंबर ना काँल करायची वेळ आली, की शांतपणे ते आयव्हीआरएस सांगेल तसं करायच, मग कालांतराने आपण त्या अदृश्य त्यावेळच्या आपल्यासाठी देवदूतापर्यंत पोहोचतो. मग, माझं पहिलं विधान, हमारा काँल रिकार्ड हो रहा हैं क्या? मग तो/ती म्हणतो, जी सर. मग मी म्हणतो, प्लीज वेट, मैं भी अपना काँल रेकाँर्ड करता हूँ। मग माझ्या ओव्हर स्मार्ट मोबाईल मधलं रेकाँर्डींग आँन करतो. व डिट्टो, ते लोक्स कसं नाव गाव पत्ता विचारतात ना, तसेच त्या/तीला नाव गाव पत्ता, सिनियरचे नाव, ईमेल आयडी असले डिटेल्स वितारतो. न जाणो, केव्हा कामास येईल!
जागो ग्राहक जागो...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
४ आँक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment