Er Rational musings #774
कर ना मन मोकळे, बोल ना घडाघडा
आतल्या आत कुथू नकोस, इच्छा मारू नकोस
झालाय जरी भावनांचा विस्फोट
साद प्रतिसादांच्या चढउतारांना विसरू नकोस
चल, एक खेळ खेळूया,
डोळे बंद करून स्तब्ध बसूया
ऊन पावसाचा लपंडाव ऐकूया!
चढ उतार, भरती ओहोटी आठवूया
मातीचा मृद्गंंध श्वास भरून घेऊया
पेरावे तसं उगवतं हे जाणूया
आँक्सीजन समसमान वाटून साठवूया
ऊंची विनम्रता, ताठ बाण्याने जगूया!
पौर्णिमा अमावस्या, हिवाळा व ऊन्हाळा
अखंड हे अविरत अव्याहत ॠतू चक्र
दिवसांमागे रात्र, उजाडणारा काळोख,
नव उष:काल पचवूया
कारण नंतर ढगांआड वीजांचा,
आहेच ना धो धो पावसाळा!
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२५ आँक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment