Wednesday, October 26, 2016

Er Rational musings #777

Er Rational musings #777



परीटघडीचे कपडे

लगबग

रूखवत सप्त पदी

गोरे गोमटे घारे

नऊवारी नथ

सीमांत पूजन नो हळदी बिळदी संगीत बिंगीत लो की

अर्धे अधिक चेहरे ओळखीचे

गजरे वाटप

मंगलाष्टकं

भरजरी साड्या दागिने

सनई चौघडा

सरळ खुर्च्या दूपारची गँप रिसेप्शन पर्यंत

तमाम आज्या फ्रंट रो डोळेभरून आशिर्वाद

होतकरू तरूणीतरूणा वधूवर करवली

नाव घेणं पंगत आग्रह रांगोळी

(चक्क) आहेर नोंदवायला

एक इकुडचा व एक तिकूडचा

फोटो व्हिडीयो

लहानगे तिकडून इकडून मध्ये अधे

दूपारचा पत्यांचा बेत

श्रीखंड जिलबी बासूंदी

आइस्क्रीम गुलाबदाणी

अक्षता गुलाबाचं फूल

देणीघेणी गळाभेट

आशिर्वाद चमत्कारनमस्कार

सोपस्कार

निरोप

आमच्या xxxला सांभाळून घ्या हं

काळजी करू नका, आमचीच झाली

मिठीभेटगळा रडारड



जाss मुली जा, दिल्या घरी तूss सुखी रहाsss



खट्ट्याक, अहो जागे व्हा, कुठल्याकुठे गेलात!



चहा पिऊन झाला(ले), आता परत कामाला लागतो...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२६ आँक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment