Wednesday, September 9, 2015

Foodie's paradise #10

Foodie's paradise #10



उसळ पाव म्हणजे आद्य क्रांतिकारक डिश. सोडा लेमन मिक्स म्हणजे आद्य क्रांतिकारक पेय कॉम्बिनेशन.



कुठलीही उसळ असो, तिच्यात लादी पाव बूडवून, लडवून, लिबलिबित करून खाण्यासारखे सुख नाही! पातळ, तेलाचा तवंग आलेली, पाण्यासारखी वगैरे कशीही असली तरी उसळ, पावाबरोबर हापसण्यासारखे दूसरे सुख नाही! सोबतीला बारीक चिरलेला कांदा, सोनेपे सुहागा. पहिली डिश संपवताना, शेवटची उरलेली, सर्वात खाली राहीलेली उसळ, पावाच्या शेवटच्या घासाबरोबर चाटून पुसून स्वच्छ करण्याचा आनंद व चव केवळ अविस्मरणीय!



एका बैठकीत किमान दोन प्लेट उसळी, कमीतकमी 5 पावांबरोबर फस्त केल्याने परमोच्च आनंदासमाधान प्राप्त होते, हे अनुभवाचे बोल आहेत.



असा फडशा पाडल्यानंतर, सोडा लेमन कॉम्बिनेशन हा सुखांत! तीन जण असले तर 2 लेमन व एक सोडा हे प्रमाण आयडियल आहे.



आणि अत्यंत महत्वाची गोष्ट...

हॉटेल जेवढे दिसायला घाणेरडे, कळकट मळकट, तेव्हडे प्रिफरेबल व रेकमेंडेड.



जागा, काळ, वेळ काहीही बंधने नसलेला युनिव्हर्सल पोटभरतीचा मेनू...

---

मिलिंद काळे, 9th September 2015

No comments:

Post a Comment