Er Rational musings #15
सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, **** सहर्ष सादर करीत आहे, ** अंकी, धमाल विनोदी नाटक......
आणि नंतर सर्व नामावली, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, इत्यादी इत्यादि!
घंटा (दवंडी?) - म्हणजे पडद्या आडून, घंटा वाजवत, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणे - यामूळे एक पिक्यूलियर लहान ते मोठा होत जाणारा घंटेचा, भासणारा आवाज प्रेक्षकांना ऐकू येतो. नंतर नारळ फोडणे व पडदा बाजूला (हो, बाजूला. वर जाणारे पडदे काहीच नाट्यग्रूहांना होते) होणे...
राज्य नाट्य स्पर्धेतील @30 वर्षांपूर्वीची व "बेस्ट" मधील एकांकिका स्पर्धां मधल्या 1985-90 च्या आठवणी.
वाचन, रंगीत तालमी, प्रयोग, व पारितोषिक समारंभ; धम्माल, फुल्ल टू. 'बेब्ज इन द वूड' ही आमची एकांकिका स्पर्धेत दूसरी आली (1989), तेव्हा झालेली हॉटेल ओव्हल (इरोस सिनेमा बिल्डिंग मधलं, मागच्या बाजूचं) येथील बियर पार्टी!
ह्याच काळात एका थर्टी फर्स्ट डिसेंबर च्या रात्री, रविंद्र नाट्य मंदिरात बघीतलेलं नाटक (12 ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत). एका खास मित्रा (!) बरोबर. अर्थातच त्यापूर्वी हॉटेल मधूबन (प्रभादेवी नाका - नंतर कालांतराने हे बंद झालं) - मी अक्षरश: रिचवलेली 7-8 वेगवेगळी कॉकटेल्स! प्लएंटर्स पंच, ब्लडी मेरी, स्क्रू ड्रायव्हर, टोम काोलिन्स वगैरे. काहीही. नो लॉजिक!
मंतरलेले दिवस.
A MEMOIR!
---
मिलिंद काळे, 8th September 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment