Er Rational musings #27
आला आला आला आणि गेला गेला गेला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, येणार येणार म्हणत आला आणी गेला पण. कितीही म्हटलं तरी मनाला चुटपुट लाऊन गेला. आणि कसं आहे, की, गणपतीचं विसर्जन केल्यानंतर काही तास तरी प्रचंड हुरहूर आजही लागते.
अण्णा, बाबा, मी व आता मिहीर - आर्यन... आमची, काळ्यांची, चौथी पिढी. व स्मरणातली 40-45 वर्षं!
लहानपणापासून गणपती उत्सव दणक्यात होतो. दीड(च) दिवस; पण लगबगीचे, धमाल, मजेचे. तेव्हा आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन, सगळ्या आरत्या जोरात, जोशात म्हणायचो. एकापाठोपाठ एक! संध्याकाळी 7-7.30 ते 10, 11 पर्यंत, फूरसत!
आजही सगळ्या - खूपश्या आरत्या तोंडपाठ आहेत त्या माझ्या आजोबांच्यामुळे! दीड दिवस माणसांचा राबता पहिल्यापासूनच. विसर्जन अगदी आत्ता आत्ता पर्यंत तिसर्या वाडीतल्या (!) विहिरीमध्ये. हल्ली काही वर्ष मात्र, गाडीत बसवून, लांब कुठेतरी...
काळ बदलतोय, आपण झपाट्याने मोठे होतोय पण गणपती मात्र? आहे तस्साच!
एक दो तीन चार, गणपतीकी जयजयकार
पाच छे सात आठ, गणपती हैं हमारे साथ
नौ दस ग्यारा बारा, गणपती हैं सबको प्यारा
तेरा चौदा पंधरा सोला, गणपती का चूँहा बोला,
क्या बोला?
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।
पूढच्या वर्षी लवकर या 🙏
---
मिलिंद काळे, 18th September 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment